My clinic

नमस्कार...मागच्या वेळी मी माझा परिचय करून दिला..आज मी माझ्या क्लिनिक विषयी थोडसं बोलते. डॉ कडलासकर ह्यांच्या संजीवनी हॉस्पिटल मध्ये माझं क्लिनिक आहे. लक्ष्मी बाग कॉलनी म्हणजे तळेगाव नगर परिषदेच्या जवळ हे हॉस्पिटल आहे. 

मागे सांगितल्याप्रमाणे माझं स्पेशलायझेशन हे musculoskeletal physiotherapy मध्ये आहे. सोप्या शब्दांत सांगायचं तर orthopaedic. म्हणजे मुख्यतः हाडं, सांधे आणि स्नायू ह्यांचे विकार. पाठदुखी, मानेची दुखणी, फ्रोजन शोल्डर, टेनिस elbow, फ्रॅक्चर नंतर दैनंदिन कामे व्यवस्थित करता यावीत ह्या सगळ्यासाठी उपचार उपलब्ध आहेत. 

हे जरी माझं स्पेशलायझेशन असलं तरी इतर neurological आजार, श्वासाचे विकार, बायकांना डिलिव्हरी नंतरचे व्यायाम हे सगळं आम्ही कॉलेज मध्ये शिकतो. त्यामुळे ह्याचेही बेसिक उपचार मी करू शकते. आणि जर ते माझ्या योग्यते पलीकडचे असतील तर इतर तज्ञांना रेफर करू शकते. 

माझ्या क्लिनिक मध्ये आत्ता TENS, IFT, Ultrasound, Traction आणि electrical stimulation ही मशीन आहेत. ही मशिन्स वेदना कमी करण्यासाठी वापरली जातात. ह्याचे कुठलेही दुष्परिणाम किंवा साईड इफेक्ट्स नाहीत. अनेक रुग्णांना ह्यामुळे चांगला गुण येतो. 

पण त्याचबरोबर हे ही जाणून घ्यायला हवं की ही मशिन्स तात्पुरतं काम करतात. वेदनेला समूळ नष्ट करण्यासाठी व्यायाम अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि कुठल्याही फिजिओथेरपिस्ट ची सगळ्यात महत्त्वाची मशिन्स म्हणजे तिचा मेंदू आणि हात. ही मशिन्स जी जादू करू शकतात ती नक्कीच इतर मशिन्स पेक्षा सरस ठरते. 

सध्या मी पेशंट फक्त appointment नी घेते आहे. फिजिओथेरपी च्या एका सेशन ला कमीत कमी अर्धा पाऊण तास लागतो. त्यामुळे तुमचाही वेळ जाऊ नये आणि मलाही प्रत्येक पेशंट ला योग्य वेळ देता यावा म्हणून ही appointment ची system अगदी सुरुवातीपासून ठेवलेली आहे. आणि आजकाल आपल्या सगळ्यांकडे फोन आहेत त्यामुळे appointment घेणं अगदी सोपं आहे. आणि दिलेल्या वेळेवर आलं पाहिजे हे सांगण्याची गरज पडू नये. 

तर खरंतर तुम्हाला कोणालाच माझी गरज पडू नये अशीच माझी इच्छा आहे. सगळ्यांनी निरोगी वेदनामुक्त राहावं. पण गरज पडलीच तर नक्की संपर्क साधावा.
धन्यवाद. 

टिप्पण्या