पोस्ट्स

एप्रिल, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

My clinic

नमस्कार...मागच्या वेळी मी माझा परिचय करून दिला..आज मी माझ्या क्लिनिक विषयी थोडसं बोलते. डॉ कडलासकर ह्यांच्या संजीवनी हॉस्पिटल मध्ये माझं क्लिनिक आहे. लक्ष्मी बाग कॉलनी म्हणजे तळेगाव नगर परिषदेच्या जवळ हे हॉस्पिटल आहे.  मागे सांगितल्याप्रमाणे माझं स्पेशलायझेशन हे musculoskeletal physiotherapy मध्ये आहे. सोप्या शब्दांत सांगायचं तर orthopaedic. म्हणजे मुख्यतः हाडं, सांधे आणि स्नायू ह्यांचे विकार. पाठदुखी, मानेची दुखणी, फ्रोजन शोल्डर, टेनिस elbow, फ्रॅक्चर नंतर दैनंदिन कामे व्यवस्थित करता यावीत ह्या सगळ्यासाठी उपचार उपलब्ध आहेत.  हे जरी माझं स्पेशलायझेशन असलं तरी इतर neurological आजार, श्वासाचे विकार, बायकांना डिलिव्हरी नंतरचे व्यायाम हे सगळं आम्ही कॉलेज मध्ये शिकतो. त्यामुळे ह्याचेही बेसिक उपचार मी करू शकते. आणि जर ते माझ्या योग्यते पलीकडचे असतील तर इतर तज्ञांना रेफर करू शकते.  माझ्या क्लिनिक मध्ये आत्ता TENS, IFT, Ultrasound, Traction आणि electrical stimulation ही मशीन आहेत. ही मशिन्स वेदना कमी करण्यासाठी वापरली जातात. ह्याचे कुठलेही दुष्परिणाम किंवा साईड इफेक्ट्स नाहीत. अन...

INTRODUCTION

नमस्कार. मी डॉ सावनी मंदार परगी. सुरुवातीला माझा थोडक्यात परिचय करून देते. मी फिजियोथेरपीस्ट आहे. बारावी सायन्स नंतर मी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज कॅम्पस मध्ये असलेल्या डेक्कन एडुकेशन सोसायटीस ब्रिजलाल जिंदाल कॉलेज ऑफ फिजियोथेरपी मधून बॅचलर ऑफ फिजियोथेरपी चे शिक्षण घेतले. पुढे मी तळेगावातल्या मायमर मेडिकल कॉलेज मधल्या माईर्स फिजियोथेरपी कॉलेज इथून मास्टर्स इन मसक्युलोस्केलेटल फिजियोथेरपी चे शिक्षण घेतले. शिक्षण संपलं आणि पुढे अनेक मार्ग खुले झाले. काय करावं असा विचार सुरु झाला. माझ्या क्लिनिक च्या पोस्टर बरोबर असलेल्या मेसेज मध्ये मी माझ्या आणि तळेगावच्या नात्याबद्दल लि...