INTRODUCTION


नमस्कार. मी डॉ सावनी मंदार परगी. सुरुवातीला माझा थोडक्यात परिचय करून देते. मी फिजियोथेरपीस्ट आहे. बारावी सायन्स नंतर मी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज कॅम्पस मध्ये असलेल्या डेक्कन एडुकेशन सोसायटीस ब्रिजलाल जिंदाल कॉलेज ऑफ फिजियोथेरपी मधून बॅचलर ऑफ फिजियोथेरपी चे शिक्षण घेतले. पुढे मी तळेगावातल्या मायमर मेडिकल कॉलेज मधल्या माईर्स फिजियोथेरपी कॉलेज इथून मास्टर्स इन मसक्युलोस्केलेटल फिजियोथेरपी चे शिक्षण घेतले. शिक्षण संपलं आणि पुढे अनेक मार्ग खुले झाले. काय करावं असा विचार सुरु झाला. माझ्या क्लिनिक च्या पोस्टर बरोबर असलेल्या मेसेज मध्ये मी माझ्या आणि तळेगावच्या नात्याबद्दल लिहिलं आहे. ही माझी जन्मभूमी आहे. मी इथेच वाढले. मोठी झाले. तळेगावनी कायमच माझ्यावर माया केली. म्हणून इथेच राहून ह्या गावासाठी काहीतरी करायची माझी खूप इच्छा होती.

 

योगायोगाने काही कारणाने संजीवनी हॉस्पिटल मध्ये डॉ गौरी कडलसकर ह्यांची भेट झाली. आणि त्यांच्या आणि डॉ कडलसकर सरांच्या सहयोगाने मला माझं क्लिनिक इथे सुरु करायची संधी मिळाली. गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर माझ्या क्लिनिक चं उदघाटन झालं. तुम्हाला उपचार, वेळ अँपॉईंट्मेंट वगैरे गोष्टींबाबत बोलायचे असल्यास खाली दिलेल्या नंबर वर संपर्क नक्की करा.

 

फिजियोथेरपी ही उपचार पद्धत खूप वर्षांपासून चालत आली आहे. आज ती खूप प्रसिद्ध ही आहे. पण अजूनही फिजियोथेरपी बद्दल काही शंका आहेत, गैरसमज आहेत. म्हणून एक फिजियोथेरपीस्ट म्हणून ह्या क्षेत्रातील जागरूकता वाढवण्यासाठी मी माझं योगदान दिलं पाहिजे असं मला वाटतं. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डॉक्टर आणि पेशंट मध्ये संभाषण अतिशय महत्वाचं आहे.

 

ह्या दोन्ही कारणांसाठी मी हे फेसबुक पेज तयार केलं आहे. त्या बरोबरच माझं एक ब्लॉग पेज पण बनवलं आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. ह्या दोन्हींवर मी काही माहिती, चांगले विचार पाठवत राहीन. त्यामुळे ह्या पेजेस ना नक्की फॉलो करा. ज्यांना वाचायचा कंटाळा येतो त्यांच्यासाठी व्हिडिओ आणि ज्यांना व्हिडिओ बघायचा कंटाळा येतो त्यांच्यासाठी ब्लॉग.

 

तर माझं क्लिनिक अजून मोठं होऊ दे, आधुनिक सोयींनी सुसज्ज करण्याचं सामर्थ्य मला मिळू दे ह्यासाठी तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद कायम राहू द्या.

 

धन्यवाद.

 

 

 

   


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा